India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुड न्यूज….३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या झेडपीच्या कर्मचाऱ्यांचा होणार हा फायदा…

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या २८ जुन २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३० जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना एक जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्र ही निर्गमित करण्यात आले. परंतु राज्यातील जिल्हा परिषदांचे कर्मचारी हे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम शासन निर्णय व परिपत्रके थेट लागू होत नाही आणि सदरील शासन निर्णय लागू करावयाचे झाल्यास महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग हा स्वतंत्र आदेश काढून सादर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करतो यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील हा शासन निर्णय लागू व्हावा यासाठी जिल्हा परिषद पेंशनर्स असोसिएशन त्याचबरोबर कर्मचारी संघटना यांच्या वतीने मागणी केली जात होती.

जिल्ह्याचे पालकमंत्रीदादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संघटनांच्या वतीने यासंदर्भात पाठपुरावा केला जात होता, पालकमंत्री ना.दादाजी भुसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली होती. त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी देखील पेंशनर्स असोसिएशन, कर्मचारी संघटना यांच्या निवेदनास अनुसरून, ३० जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शासनास सादर करून ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र देऊन शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे अशी विनंती केली होती.

ग्रामविकास विभागाने यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार ३० जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणा-या कर्मचा-यांना लगतच्या जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यामुळे आता ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या जिल्हा परिषद सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना १२ महिन्यांची अहर्ताकारी सेवा गृहीत धरून १ जुलै रोजीची वेतनवाढ लागू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. पूर्वीच्या काळी शालेय प्रवेशावेळी बहुतांश विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही जुन महिन्यातील टाकली जात असे त्यामुळे जून महिन्यात नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आहे, या सर्व कर्मचाऱ्यांना सादर शासन निर्णयामुळे १ जुलैच्या वार्षिक वेतनवाढीचा सेवानिवृत्ती वेतनात लाभ होणार आहे.

१ जुलै रोजीची वेतनवाढ लागू
वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामविकास विभागाने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या नाशिक जिल्हा परिषद सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सेवानिवृत्ती वेळी कार्यरत असणाऱ्या कार्यालयाकडे सादर करावे या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने १ जुलै रोजीची वेतनवाढ लागू करण्यात येईल.
आशिमा मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक
ZP employees who retired on June 30 will get this benefit…


Previous Post

जिओचे बहुप्रतिक्षित एअर फायबर लाँच; या ८ शहरांमध्ये सेवा सुरू, अशी आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना; गणरायाला घातले हे साकडे

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना; गणरायाला घातले हे साकडे

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group