नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर, अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयातील तब्बल १९ मोटार सायकल चोरी करणा-या चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पंचवटी पोलीस ठाणे, गुन्हेशोध पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १४ सप्टेंबर रोजी रात्री पोलिस गस्त घालत असतांना एक जण हा काटयामारुती चौक पंचवटी नाशिक येथे येणार असल्याचे समजल्याने सदर पथकासह काटया मारुती चौकाच्या आजुबाजुस सापळा लाऊन थांबले असता तेथे एक संशयीत हा विना नंबर प्लेटची मोटर सायकल घेवुन जातांना मिळून आला. त्यास पथकाने थांबविले असता असता तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारले असता त्याने कोणतीही माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे दिले.
त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने राजु प्रकाश पिंपळे, वय – ४० वर्षे, रा. बाजीराव गोदकर वस्ती, सनन हॉटेलच्या पुढे, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर असे आपले नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर त्याने ही मोटर सायकल त्याचा साथीदार शोयेब गफुर शेख, वय २४ वर्षे, रा. नांदुरमध्मेश्वर रोड शेखवस्ती, तासदिंडोरी गाव, ता. निफाड, जि. नाशिक ता. राहता जि. अहमदनगर येथून चोरी केल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्याकडे पोलिस विष्णु जाधव व संतोष पवार यांनी सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार शोयेब शेख यांनी पंचवटी पो. स्टे कडील गुरन ३५२ / २०२३ भादवि ३७९ मधील ०२ मोटर सायकल तसेच औरंगाबाद, अहमदनगर जिल्हयातुन वेगवेगळया कपंनीच्या मोटर सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा साथीदार शोयेब गफुर शेख, वय २४ वर्षे, रा. नांदुरममेश्वर रोड शेखवस्ती, तासदिंडोरी गाव, ता. निफाड, जि. नाशिक याचे कडुन त्याचे राहते घराजवळुन खालील मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असुन दोन्ही आरोपींतांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त परिमंडळ – १ किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त नितीन जाधव, यांनी नाशिक शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंचवटी पोलीस स्टेशन अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि रोहित केदार व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयातील मोटर सायकलचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या होत्या.
As many as 19 motorcycle thieves in Nashik city, Ahmednagar and Aurangabad districts have been arrested