इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना वर्ल्ड कपमधील सामन्याचे गोल्डन तिकीट दिले आहे. दाक्षिणात्य चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारा रंजनीकांतला ही अनोखी भेट ठरली आहे.
यावेळेसचे वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने ही भेट जय शहा यांनी दिली आहे. याअगोदर अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकरचाही गोल्डन तिकीट देण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या सामन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे हे तिकीट शाह यांनी रंजनीकांतला दिले. त्यानंतर बीसीसीआयने फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जय शहा यांनी रजनीकांत यांना गोल्ड तिकीट देत त्यांचा सन्मान केल्याचं, बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.
या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे, ज्यामध्ये सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत.
विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात
या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.
BCCI Secretary Jai Shah gave this gift to Superstar Rajinikanth on the occasion of World Cup