नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राजकारण आरोप – प्रत्यारोप होत असतो, एकमेकांच्या विरोधात नेते निवडणूक लढवतात. पण, त्यांचा हा विरोध सर्वच ठिकाणी नसतो. असाच एक फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, रंजन चौधरी हे दिसत आहे. हा संसदेतील आजचा फोटो आहे.
देशात भाजप व काँग्रेसमध्ये सत्तासंघर्षामुळे सध्या विस्तवही जात नाही. एकमेकांवर या दोन्ही पक्षाचे नेते टोकाची टीका करतात. त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरला झाला आहे. त्याचप्रमाणे संसदेत ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांचाही फोटो चांगलाचा व्हायरला झाला आहे. या फोटोमध्ये ज्योतिरादित्य सोनीया गांधी बरोबर बोलता आहे. तर एका फोटोत ते सोनीया गांधी बरोबर बसले आहे. संसदेतील सेंट्रल हॅालमधील हे फोटो आहे.
खरं राजकारणात कोणी एकमेकांचे शत्रू नसतात. त्यांची विचारधारा वेगवेगळी असते. महाराष्ट्रात असे चित्र नेहमी दिसते. पण,दिल्लीत असे क्षण व फोटो कमीच असतात. त्यामुळे हे फोटो चर्चेचे ठरले आहे.