मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसापासून पावसाने राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गणपती पावणार आहे. राज्यातील पुढील ४८ तासांत बहुतांश भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता सुरु झाले आहे.
२१ सप्टेंबरपासून मुंबई पुण्यासह कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने अगोदर वर्तवला आहे. त्यासाठी हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला होता.
आता बुधवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Heavy rain today in this district after the arrival of Ganapati Bappa