येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील विसापूर येथे शिकारीचे शोधात असलेला बिबट्या आज पहाटेच्या सुमारास एका विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी बिबट्या बघण्यासाठी एकच गर्दी केली. वन विभागाचे रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली असून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात दिसत आहे. कधी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडतात. तर कधी बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटना समोर येतात. येवल्यातही बिबट्या शिकारीच्या शोधात असतांना स्वतच शिकार झाला. त्याला वाचवण्यासाठी अखेर रेस्क्यू टीम आली. त्यानंतर त्याचे प्राण वाचले.
खरं तर दुष्काळाच्या वेळी पाण्याच्या शोधात असतांना प्राणी विहिरीत पडतात. पण, सर्वत्र पाऊस झाल्यानंतर बिबट्या विहिरीत पडला. त्यामुळे सर्वांना आश्चर्यही वाटले.
A leopard that went in search of a hunter fell into a well in Yeola taluka