येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगवान श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिनाचा अष्टशताब्दी वर्षाची सांगता सोहळा रविवारी शहरातील विंचूर रस्त्यावरील गो शाळा मैदानावर पार पडत आहे.या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून राज्यभरातून सुमारे १५ हजार भाविक हजेरी लावणार आहेत.
नाशिक जिल्हा व येवला तालुका महानुभाव समितीच्या वतीने अवतार महोत्सवाच्या अष्टशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरच्या अवतार महोत्सवासाठी महानुभाव पंथातील सुमारे ५०० संत महंत व १५०० भिक्षुक उपस्थित राहणार असून शनिवारी दुपारी ३ ते ६ वाजेपावेतो श्री मूर्तीची संत महंतांसह शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.यावेळी पालखी पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधकीसन सोनवणे व भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .यानंतर सायंकाळी ७ वाजता भागवताचार्य प पू महंत चिरडे बाबा यांचे व्याख्यान होणार आहे.रविवारी सकाळी ६ वाजता देवास मंगलस्नान ,श्री मूर्ती पूजन व विडावसर,सकाळी ७ वाजता श्रीमद भागवत गीतापाठ पारायण व नामस्मरण,९ वाजता प पू मयंकराज बाबा पंजाबी व दिनकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण ,प.पू.डॉ यशराज बाबा शास्त्री व डोळसकर बाबा यांच्या हस्ते धर्मसभा मंडप उदघाटन होणार आहे.
माजी आमदार मारोतीराव पवार ,आ दिलीप बनकर,आ नरेंद्र दराडे,आ आशुतोष काळे,दिलीप खैरे,माजी आ स्नेहलता कोल्हे,उद्योगपती पुंजाभाऊ सांगळे ,माजी खासदार समीर भुजबळ ,माजी आ पंकज भुजबळ आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे.ज्ञानसत्राच्या सभाध्यक्षपदी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलभूषण प पू विध्वंसबाबा,कार्यध्यक्ष म्हणून प पू पुजदेकर बाबा उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प पू सुकेणकर बाबा असणार असून संभाजीनगर येथील प पू संतोषमुनी शास्त्री कपाटेव बकतरपूर येथील प पू कानसळकर बाबा हे प्रमुख वक्ते असतील तर स्वागताध्यक्ष म्हणून चिरडे बाबा हे काम पाहणार आहेत.
सोहळ्याला प पू मराठे बाबा ,गोपीराज शास्त्री, भविकराज बाबा अमृते,भिंगारकर बाबा,रेलकर बाबा,प्रेममुनी महानुभाव, दत्तराज बाबा पालिमकर, गौरवमुनी लोणारकर,माथेराज बाब कपाटे,तपस्वीराज पंजाबी आदी संत महंत तर माजी आ बाळासाहेब सानप, बाळासाहेब क्षीरसागर ,जयदत्त होळकर,ऍड माणिकराव शिंदे,महेंद्र काले, संभाजी पवार आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सदर अवतार महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जेष्ठ नेते अंबादास बनकर,सीताराम आंधळे,तानाजी आंधळे,बाळासाहेब लोखंडे,सुकेणकर बाबा ,चिरडे बाबा ,दत्तराज बाबा चिरडे आदींनी केले आहे.
सोहळ्यासाठी वॉटर प्रूफ मंडपाची तयारी–
सोहळ्याला राज्यभरातून सुमारे १५ ते २० हजार भाविक उपस्थिती लावण्याची शक्यता असल्याने सुमारे ५० हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडपाची जय्यत तयारी गो शाळा मैदानावर सुरू आहे