शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लेन मॅक्‍सवेल नावाचा बाजीगर… ऑस्‍ट्रेलियाचा संघ जिंकेस्‍तोवर मैदानात अशी दिली लढत..

नोव्हेंबर 8, 2023 | 10:40 am
in संमिश्र वार्ता
0
F WLkbpXAAAEofZ

जगदीशदेवरे
अफगाणिस्‍तानने कांगारुची वरात जवळ जवळ काढलीच होती. मुंबईच्‍या वानखेडेवर मिचेल स्‍टार्क ९१ वर बाद झाला तेव्‍हा ऑस्‍ट्रेलियाचे ७ गडी तंबुत परतलेले होते. सामना हातचा जातोय म्‍हणून कांगारुंची धडधड तर वाढली होतीच शिवाय तिकडे न्‍युझीलंड आणि पाकिस्‍तानच्‍या गोटात देखील स्‍मशान शांतता पसरली होती. परंतु, संघ जिंकल्‍याशिवाय खेळपट्टीवरून हटणार नाही अशी बाजीप्रभूंच्‍या धाटणीतली खास पराक्रमी शैली अवलंबून ग्‍लेन मॅक्‍सवेल घोडखिंडीत उतरला आणि संघ जिंकेस्‍तोवर मैदानात एकटा लढत राहीला. ७ गडी बाद झालेले असल्‍याने एरव्‍ही कमी वाटणारी २९१ ही धावसंख्‍या ऑस्ट्रेलियाला विशाळगडासारखी भव्‍य वाटायला लागली होती. अनेकांनी तर अफगाणिस्‍तान संघाच्‍या विजयाचे स्‍वप्‍न ८० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवून ठेवले होते. परंतु, मॅक्‍सवेल मधला शूर योध्‍दा त्‍याच्‍या अतुलनीय पराक्रमासाठी सज्‍ज होवूनच मैदानात उतरला आणि गड जिंकून गेला.

क्रिकेटमध्‍ये काही पराक्रम हे उघड्या डोळयांनी बघायचे असतात. त्‍यांचे वर्णन एैकून ते फार तर समजतात परंतु त्‍यात गोडवा नसतो. १९८३ साली भारताने प्रुडेन्शिअल विश्‍वचषक जिंकला तेव्‍हा अशाच एका सामन्‍यात झिम्‍ब्‍बाव्‍वे विरुध्‍द कर्णधार कपिलदेवने महापराक्रम केला होता. कपिलचा तो डाव ध्‍वनीफितीत सुध्‍दा उपलब्‍ध नाही याचे सदैव जाणवणारे दु:ख मॅक्‍सवेलच्‍या या डावाने पुसून काढले. कपिल त्‍यावेळी अगदी असाच जिवाची बाजी लावून खेळला असेल.

मॅक्सवेलच्या पायाला क्रॅम्‍प आल्‍यानंतर अफगाण गोटात थोडी खुशी पसरली होती. त्‍याला दोन तीन जीवदाने मिळून देखील तो बाद झालेला नसल्‍याने त्याच्‍या “रिटायर्ड हर्ट” होण्‍याची विपक्षी संघाने आशा ठेवणे स्‍वाभाविक होते. परंतु, मॅक्‍सवेल लढवय्या आहे. त्‍याच्‍यात जिगर आहे आणि डोळ्यात महत्‍वाकांक्षा आहे. त्‍याने ही सगळी ताकद वापरात आणली आणि आजपर्यंत कुणीही बघितला नसेल असा पराक्रम साध्‍य करून दाखवला. इतक्‍या गंभीर अवस्‍थेत फलंदाजी करायची म्‍हणजे जरब लागते आणि प्रबळ मानसिकता देखील लागते. मॅक्‍सवेलने ती निर्माण केली होती. पळून धावा करण्‍यामध्‍ये धोका आहे असे जाणवल्‍यावर त्‍याने खराब बॉल निवडले आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून स्‍वत:चे विक्रमी व्दिशतक आणि संघाचा विजय साकार केला. वानखेडेवर मॅक्‍सवेल नावाचा एक क्रिकेटपटू मैदानावर उतरलेलाच नव्‍हता तर एका क्रिकेटपटूच्‍या वेशातला ऑस्‍ट्रेलियन सैनिक तिथे लढत होता अशा जाणिवा निर्माण करणारी ही खेळी होती. देशाभिमान जेव्‍हा जागृत होतो तेव्‍हा हे असले जगावेगळे पराक्रम बघायला मिळतात. मॅक्‍सवेलचे हे शौर्य आता एक इतिहास बनले आहे. एक असा इतिहास जो कायम स्‍मरणात राहील… ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या, अफगाणिस्तानच्या चाहत्यांच्या आणि एक त्रयस्थ म्हणून आनंद लुटणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांच्या.
जगदीश देवरे
indiadarpanlive #WorldCupCricket #Maxwell

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुड न्यूज… आदित्य एल-1 च्या यशाची इस्त्रोने दिली ही माहिती… केले हे ट्वीट

Next Post

मुंबईत भूतानचे राजे म्हणाले भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल…सांगितला हा किस्सा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
unnamed 2023 11 08T105011.262

मुंबईत भूतानचे राजे म्हणाले भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल…सांगितला हा किस्सा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011