इंडिया दर्पण डेस्क
विराट कोहलीने इतिहास रचत वनडे क्रिकेटमधील ४७ वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने १३ हजार धावाही पूर्ण केल्या त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतांना पाकिस्तानी संघाचा माजी दिग्गज खेळाडू वकार युनिसने विराट कोहली आपलं करिअर संपेपर्यंत तीन आकडी शतकांचा टप्पा गाठेल असे वक्तव्य केले आहे. तो शतकांमध्ये सचिन तेंडुलकरला फक्त मागेच टाकणार नाही, तर कोणी विचारही केला नसेल इतकी शतकं ठोकेल असे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ४७ वे शतक ठोकल्यानंतर वकार युनिसचे हे वक्तव्य समोर आले आहे….
सोमवारी विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात या १३ हजार धावा पूर्ण केल्या. विराट हा १३ हजार धावा पूर्ण करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पॉटिंग आणि सनथ जयसूर्या यांनी १३ हजार धावांहून अधिक पूर्ण केल्या आहेत.
या अगोदर १३ हजार धावा पूर्ण करणारे हे खेळाडू आहे. त्यात सचिन तेंडुलकरने ३२१ सामन्यात, रिकी पॉटिंगने ३४१ सामन्यात, कुमार संगकाराने ३६३ आणि सनथ जयसूर्याने ४१६ सामन्यात १३ हजार धावा केल्या आहेत. विराट कोहली याने २६७ सामन्यात या धावा पूर्ण केल्या आहे.
सोमवारी विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची ही भारताची मोठी भागीदारी आहे. पाकिस्तान विरुद्ध नाबाद २३३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव झाला. आता वकार युनिसचे हे वक्तव्य समोर आले आहे….
After Virat Kohli’s 13,000 runs, 47th century, this statement of the former legendary player of Pakistan is in discussion