नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी – नाशिक रस्त्यावरील लखमापूर फाटा येथे प्रसूती कळा सूरु असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मेंढपाळ महिलेला पोलिसांनी पोलिस वाहनातून रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. पाऊस सुरु असतांना या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी या महिलेचे कुटुंबिय वणीकडे जाण्यासाठी लखमापूर फाट्याजवळ वाहनांना हात देत होते. पण, वाहन मिळत नव्हती. अशाच पोलिसांचे वाहन आले. त्यानंतर पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्यांच्या वाहनाने
महिलेला रुग्णालयात दाखल केले.
शुक्रवारी रात्रीच्या वेळेस लखमापुर फाटयावर भर पावसात बंटु दामु बिचकुले व त्यांची गर्भवती पत्नी संगीताबाई या वणी व दिंडोरी बाजूकडे जाणाऱ्या वाहनाना हात देत होते. पण, या भर पावसात व रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतेही वाहन थांबत नव्हते. याचवेळी पेट्रोलिंग करणारी पोलिस व्हॅन दीड वाजेच्या वेळी महिला व पुरुष भर पावसात उभे असल्याचे बघून थांबली. त्यानंतर वाहनचालक विजय बच्छाव व पोलिस हवालदार पुंडलिक बागूल यांनी विचारपुस केली. त्यानंतर दोघांनी रुग्णालयात जायचे असल्याचे कारण सांगितले.
यावेळी गरोधर मातेची परिस्थिती बघून वणी पोलिसांनी सदर गर्भवती महिला व तिचे नातेवईक यांना वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. त्यानंतर एक ते दीड तासाने सदर महिलेची सुखरूप प्रसूती होऊन कन्येला जन्म दिला आहे. पोलिस हवालदार पुंडलिक बागुल व पोलिस नायक व वाहन चालक विजय बच्छाव यांनी दाखवलेले माणुसकीच्या दर्शनामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
A woman admited hospital