India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळ मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in राष्ट्रीय
0

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. युनेस्कोने X या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणाले; “भारतासाठी अधिक अभिमानास्पद! होयसळ राजघराण्याचे भव्य पवित्र स्थापत्य कलाअवशेष युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य आणि कलात्मकता हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचे पुरावे आहेत.”

मराठी विश्वकोषामध्ये होयसळ वंशाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बहुतेक होयसळ वंशी राजे जैन धर्मीय असून त्यांनी अनेक जैन पंडितांना व विद्वानांना आश्रय दिला होता. विनयादित्याच्या कारकीर्दीत वर्धमानदेव ह्या जैन साधूस होयसळांच्या व्यवस्थापनात अनन्यसाधारण स्थान होते. इरेयंग आणि पहिला बल्लाळ यांच्यावर जैन अध्यात्मगुरूंचा प्रभाव होता.

या राजांनी जैन मंदिरांना सढळ हाताने देणग्या दिल्या होत्या. या राजांपैकी विष्णुवर्धन हा पराक्रमी, शूर व श्रेष्ठराजा होता. त्याचे गुरू रामानुजाचार्य यांनी या जैन राजाला वैष्णव धर्माची दीक्षा दिली (१११६) आणि विष्णुवर्धनदेव असे त्याचे नवे नामकरण केले. या राजाच्या मदतीने मेलकोटे येथे विष्णूचे मंदिर बांधले. तसेच तळकाड व तोन्नर (रामानुजाचे गाव) या ठिकाणी विष्णूची मंदिरे बांधली. वैष्णवांना व ब्राह्मणांना अग्रहार दिले. बेलूर येथे विजय नारायण मंदिर बांधले.
PM hails inclusion of Sacred Ensembles of Hoysalas in UNESCO World Heritage List

🔴BREAKING!

Just inscribed on the @UNESCO #WorldHeritage List: Sacred Ensembles of the Hoysalas, #India 🇮🇳. Congratulations! 👏👏

➡️ https://t.co/69Xvi4BtYv #45WHC pic.twitter.com/Frc2IGlTkf

— UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 (@UNESCO) September 18, 2023

Previous Post

Good News: २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

Next Post

इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्रसोबत झाला सामंजस्य करार: अक्षय ऊर्जेच्या प्रक्रियेला मिळणार चालना

Next Post

इरेडाचा बँक ऑफ महाराष्ट्रसोबत झाला सामंजस्य करार: अक्षय ऊर्जेच्या प्रक्रियेला मिळणार चालना

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group