सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंत्राट भरतीच्या विरोधात नांदूर शिंगोटे येथे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाशिक – पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी जीआरची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने ६ सप्टेंबरला एक शासन निर्णय काढून सर्व शासकीय नोकऱ्या या कंत्राटीपद्धतीने भरल्या जाणार असून यासाठी खासगी ९ संस्थांना नोकरभरतीबाबतचे कंत्राट देण्यात आले आहे. त्या निर्णयावरुन हे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने काढला आहे. ६ सप्टेंबर रोजी हा जीआर काढण्यात आला असून ९ संस्थांना नोकरभरतीबाबतचे कंत्राट देण्यात आले आहे. राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारा हा निर्णय असल्याने या गोष्टीचा निषेध करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आंदोलनात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, शिवराम शेळके, संजय शेळके, राजेंद्र दराडे, सोमनाथ नवले, गणी सय्यद, अशोक गवारे, ऋषिकेश शेळके ,ओम शेळके ,बाळासाहेब शेळके, सुरेश शेळके ,ऋतिक गोसावी ,योगेश बैरागी, प्रतिक घुगे संकेत शेळके, वैभव शेळके, महेश सानप, रवींद्र घुगे ,जीवन ढाकणे आदींनी सहभाग घेतला. या निषेध आंदोलनात तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा
सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यासाठी राज्या सरकारने जीआर काढला आहे. तो अतिशय घातक प्रकारचा असून शालेय स्तरावर असलेले शिपाई पद परिचर हे पद किती दिवसांपासून भरण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी मध्ये तसेच नुकत्याच कामावर रुजू झालेले कर्मचारी, कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंत्राटीकरणाचा निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
कोंडाजी मामा आव्हाड