India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे, विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

India Darpan by India Darpan
September 18, 2023
in स्थानिक बातम्या
0


शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे प्रभाग २४ मध्ये विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. रविवारी पहाटे अनेक घरांमध्ये बल्बचे स्फोट होवून टीव्ही, फ्रीज, गिझरसह विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गॅस पाईपलाईन ठेकेदारावर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा अशा घटना घडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे महापालिकेने काही दिवसांपूर्वी खडीकरण केले. आता त्यानंतरही गॅस पाईपलाईन ठेकेदारांकडून ठिकठिकाणी खोदाई केली जात आहे. यामुळे प्रभागातील अनेक भागात सतत विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. शुक्रवारी, शनिवारी प्रियंका पार्क, जगतापनगर, कालिका पार्क भागात खोदाई करण्यात आली. विद्युत केबल खंडीत झाली. विद्युत दाब वाढल्याने रविवारी पहाटे तीन ते पाच वाजेच्या दरम्यान घरांमध्ये अचानक लाईटचे बल्ब, ट्यूब, सीसीटीव्ही स्फोट झाल्याने रहिवाशी भयभीत झाले. विद्युत पुरवठा खंडीत झाला. सोमवारीही हे दुरुस्तीचे काम वीज वितरण कंपनीकडून सुरूच आहे.

पाणी पुरवठ्यातही यामुळे अडथळा निर्माण झाला. अनेक रहिवाशांचे टीव्ही, फ्रीज, फॅन, गिझर, सीसीटीव्ही यासह विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या रस्त्यांचे, तसेच जनतेच्या विद्युत उपकरणांचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हे दखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे.

अशी घटना पुन्हा घडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, डॉ. सुनील चौधरी, राजेंद्र महाले, मुकुंद रनाळकर, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील, वंदना पाटील आदींनी दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, शहर अभियंता नितीन वंजारी यांना सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

लाखो रुपयांचे नुकसान
माझा यापूर्वी तीन लाखांचा टीव्ही नादुरुस्त झाला. काल फ्रीज, गिझर, फॅन, सीसीटीव्हीसह इतर उपकरणे नादुरुस्त झालीत. इतर रहिवाशांचेही नुकसान झाले आहे. महापालिकेने लाखो रुपयांचे नुकसान भरून द्यावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
डॉ. सुनील चौधरी, प्रियंका पार्क


Previous Post

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयांवरून शिक्षक संघटना आक्रमक

Next Post

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे कंत्राट भरतीच्या विरोधात चक्काजाम, जीआरची होळी

Next Post

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे कंत्राट भरतीच्या विरोधात चक्काजाम, जीआरची होळी

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

September 27, 2023

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित पर्यटन व्हिलेज स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकमेव गावाने मिळवले हे पदक…

September 27, 2023

पंतप्रधानांनी या फेस्टमध्ये का सांगितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघा संपूर्ण बातमी….

September 27, 2023

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group