व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सासरच्या जाचातून आधी केली मुलीची सुटका…. वाजत गाजत, आतीषबाजीसह लेकीची काढली वरात… असे केले जंगी स्वागत… व्हिडिओ व्हायरल

India Darpan by India Darpan
October 19, 2023 | 1:03 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांची : प्रत्येक तरुण मुलीच्या बापाला आपल्या मुलीच्या लग्नाची मोठी काळजी असते. मुलगी चांगल्या घरी जावी, तिने सुखात नांदवा अशी प्रत्येक पित्याची अपेक्षा असते. त्यासाठी तो मोठ्या थाटामाटात मुलीचे लग्न लावून देत सासरच्या मंडळींना खुश ठेवतो. मात्र एवढे करूनही काही वेळा सासरची मंडळी नालायक निघते. तरीही पिता सांगतो की, दिल्या घरी सुखी राहा. पूर्वीच्या काळी तर मुलीने पित्याकडे जन्म घेतल्यानंतर मरण हे सासरच्या दारीच येते, किंवा यावे अशी जणू काही विचारधारणा आणि प्रथाच होती, मात्र कालानुरूप आता यात बदल होत आहे. मुलीचा सासरी छळ होत असेल तर स्वतः ती मुलगी तो प्रकार सहन करीत नाही, तसेच तिच्या बापाला देखील सहन होत नाही, मात्र त्यानंतर कोर्टाच्या जाऊन घटस्फोट देखील होतात. रांचीमध्ये मात्र असेच एक प्रकरण घडले सासरे मुलीचा छळ झाला, इतकेच नव्हे तर तिची फसवणूक देखील झाली, या प्रकरणातून पित्याने मुलीला सोडवून आणले. इतकेच या आनंदात पित्याने मुलीची चक्क वाजत गाजत मिरवणूक काढली. आता या घटनेचे सर्व बिहारमध्ये चर्चा होत आहे, तसेच त्याचे फोटो देखील व्हायरल होत आहे.

रांचीतील कैलाशनगर भागात प्रेम गुप्ता हे गृहस्थ राहतात. मागील वर्षी एप्रिल महिन्यात मुलगी साक्षी गुप्ता हिचे झारखंडच्या वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता असलेल्या सचिन कुमार या युवकाशी लग्न लावले होते. मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्यावर काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा. आणखी भयानक गोष्ट म्हणजे लग्नाच्या वर्षभरानंतर साक्षीला कळाले की, तिच्या नवऱ्याने याआधीच २ लग्न केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे तिला समजताच तिला खूप वाईट वाटले. सर्व काही जाणूनही मी हिंमत हरली नाही आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु छळ व अत्याचाराला कंटाळून या घरात राहणे कठीण आहे हे कळल्यानंतर साक्षीने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. साक्षीच्या वडिलांनी आणि तिच्या नातेवाईकांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे या मुलीच्या पित्याने यासंदर्भात फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेले खूप व्हायरल होत आहे. मोठ्या आशेने आणि धुमधडाक्यात बाप मुलीचे लग्न लावतो. परंतु पार्टनर आणि कुटुंब चुकीचे ठरले तर आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी परत आणायला हवे कारण मुली खूप मौल्यवान असतात असे त्यांनी म्हटले.
The bridegroom took off the bridegroom with music and fireworks

https://www.facebook.com/100009753033863/videos/1733693897042591/


Previous Post

ड्रोनच्या माध्यमातून आकाशात विक्रमी उंचीवर ‘भगवा स्वराज्य ध्वज’ (बघा व्हिडिओ)

Next Post

मुंबईत जालन्यातील तरुणाची आत्महत्या….मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

Next Post

मुंबईत जालन्यातील तरुणाची आत्महत्या....मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.