नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १८ ते २३ डिसेंबर २०२३ या कालावधीत पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १८ डिसेंबर रोजी राष्ट्रपती आयआयटी खरगपूरच्या ६९ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. त्याच दिवशी राष्ट्रपती, राष्ट्रपती निलयम, बोलारम, सिकंदराबाद येथे पोहोचतील.
१९ डिसेंबर रोजी, राष्ट्रपती हैद्राबाद येथे हैदराबाद पब्लिक स्कूल सोसायटीच्या शताब्दी समारंभात उपस्थित राहतील.२० डिसेंबर रोजी, राष्ट्रपती तेलंगणा मधल्या यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातल्या पोचमपल्ली येथे वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या हातमाग आणि कताई एककांना तसेच यावरील संकल्पना दालनालाही भेट देतील. यावेळी राष्ट्रपती विणकरांशीही संवाद साधणार आहेत. त्याच संध्याकाळी, सिकंदराबाद येथे, राष्ट्रपती एमएनआर एज्युकेशनल ट्रस्टच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील.
२१ डिसेंबर रोजी राष्ट्रपती, राष्ट्रपती निलयम येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील.२२ डिसेंबर रोजी, राष्ट्रपती, राष्ट्रपती निलयम येथे राज्यातील मान्यवर, प्रमुख नागरिक, शिक्षणतज्ञ यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करतील. २३ डिसेंबर रोजी, राष्ट्रपती राजस्थानमधील पोखरण येथे गोळीबार प्रात्यक्षिकांची पाहणी करतील.
President Draupadi Murmu on a visit to these states from December 18 to 23