नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनर आपण आज ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आणि वाहिनीची लिंकही सामायिक केली. ‘एक्स’ या समाज माध्यमाव्दारे पंतप्रधानांनी माहिती दिली की, “आज माझी व्हॉट्सअॅप वाहिनी सुरू केली. या माध्यमातून जोडलेले राहण्यासाठी उत्सुक आहे ! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सामील व्हावे… https://www.whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F”
‘व्हॉट्सअॅप’ चॅनल हे नवे फिचर आले आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाले आहेत. व्हॉट्सॲप युजर्सना आता पंतप्रधानांचे सर्व अपडेट्स चॅनलवरही मिळू शकणार आहेत. या चॅनलवरील पहिल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे! हे आपल्या अखंड संवादाचं आणखी एक माध्यम आहे. चला इथे कनेक्ट होऊया! नवीन संसद भवनाचं हे चित्र आहे…”
या चॅनलमधून अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध पोस्ट पाठवता येणार आहे. त्यामुळे एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केले जाऊ शकतात. या चॅनलमध्ये तुमचा फोन नंबर चॅनल ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. व्हॉट्सॲप युजर्स एखाद्या चॅनलला फॉलो करण्यासाठी त्या नावाने चॅनल शोधू शकतात.
Prime Minister Narendra Modi now on ‘WhatsApp’ channel