व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यातील या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा….

India Darpan by India Darpan
September 22, 2023 | 7:36 pm
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाण पुलास ५० मी चे ५ स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. यावेळी चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहूल आहेर उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील देवळा तालुक्यातील महत्वाचा असलेला एनएच ७५२ जी सटाणा-देवळा-मंगरूळ रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या भू संपादित होणाऱ्या जमिनीच्या अडचणीं संदर्भात व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी गडावर जाणारा नाशिक दिंडोरी वणी रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा व रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील वाहनधारक व स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग ८४८ हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरातला जाणाऱ्या रस्त्यावरील कोटंबी व सावळघाटासह अनेक कामे प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू नये. तसेच टोल परिसरातील २० किलो मीटरच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देण्यामागची व नियमित शेतमाल ने- आण करणाऱ्‍या स्थानिक शेतकऱ्‍यांना टोलमध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली असून त्यासाठी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार करू, असे यावेळी सांगितले.

प्रस्तावित असलेला सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड रस्तासाठी जमिन भुसंपादन व शेतकऱ्यांना त्याबाबतचा योग्य मोबदला मिळण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सविस्तर चर्चा करून निवेदन दिल्याचे राज्यमंत्री डॉ.पवार यांनी सांगितले.


Previous Post

रेल्वे अपघात मदतीच्या रकमेत रेल्वे मंत्रालयाने केली सुधारणा, बघा सुधारीत दर…

Next Post

नाशिक जिल्हयातील कांदा व्यापारी बैठकीत झाला हा निर्णय (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिक जिल्हयातील कांदा व्यापारी बैठकीत झाला हा निर्णय (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.