नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी निमित्त बाहेरगावी गेलेले नागरीक घराकडे आल्यानंतर या घरफोड्या समोर आल्या. शहरातील वेगवेगळया भागात या दोन घरफोड्या झाल्या असून पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घरफोडींमध्ये चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे, रोकड असा सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
पहिली घटना गजानन नगर भागात घडली. ऋषिप्रसाद दत्तात्रेय भामरे (रा.श्रीगणेश बंगला,ओंकारेश्वर मंदिरासमोर,जे.डी.सावंत कॉलेज जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भामरे कुटूंबिय १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. व बेडरूममधील कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुस-या घटनेची तक्रार नंदीकेश राजाराम खैरनार (वय ६१ रा.पुर्णा बंगला,विश्वास बँकेजवळ,शारदानगर) यांनी दिली आहे. खैरणार कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.१८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजुच्या खिडकीचे ग्रील कापून घरातील लाकडी व लोखंडी कपाटातून सुमारे ६ लाख २९ हजार रूपये किमतीचे दागिणे लंपास केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten