मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मनमाडला दहशतवादी कारवाईच्या संशयावरून आयबी व एटीएसने एकाला ताब्यात घेतले. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रकरण करुन तो रेल्वेने जात होता. त्याला नगरसुल येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची पहाटेपर्यंत कसून चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मनमाड शहरात एफसीआय, ऑइल डेपो, रेल्वे कारखाना, रेल्वे जंक्शन असे मोठे प्रकल्प आहे. त्यामुळे येथे घातपाताची कारवाई होऊ शकते अशा संशय नेहमी तपास यंत्रणेला असतो. त्यामुळे येथे काही संशयास्पद आढळल्यास त्वरीत त्याची चौकशी केली जाते. गणेशोत्सवाचे चित्रण करतांना या व्यक्तीवर संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.
मनमाडपासून मालेगाव शहर हे काही अंतरावर आहे. येथे अशा पध्दतीने संशयास्पद व्यक्तीला अनेकदा ताब्यात घेतले गेले. तर काहींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मनमाडमध्ये या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
A man was detained on suspicion of terrorist activities in Manmad