नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पंडीतनगर भागात अल्पवयीन मुलीचा सराईतासह त्याच्या साथीदाराने विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या दांम्पत्यास सराईताने मारहाण केली असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीकेश घोलप (२०) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून बबलू शहा (२० रा.साईबाबानगर,सिडको) नामक त्याचा साथिदार अद्याप फरार आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. अल्पवयीन पीडिता बुधवारी (दि.१) रात्री परिसरातील पंडीतनगर भागात गेली होती. रस्त्याने पायी ती आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली.
समोरून येणा-या दोघा संशयितांनी तिची वाट अडविली. यावेळी पीडितेने त्यांना बाजूला होण्यास सांगितल्याने संशयितांनी तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी येवून पालकांकडे कथन केल्याने तिचे आई वडिल जाब विचारण्यासाठी संशयितांकडे गेले असता दोघांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten