नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील २३ वर्षीय तरूणाने नाशिक येथील लॅाजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम प्रल्हाद गोळे (रा.निफाड जि.नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभमच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम गोळे हा बुधवारी (दि.१) शहरात आला होता. रात्री मुक्कामी राहण्यासाठी त्याने ठक्कर बाजार परिसरातील हॉटेल पदमलक्ष्मी लॉजिंगमध्ये रूम बुक केली होती.
गुरूवारी सायंकाळी तो रूम सोडणार असल्याने कर्मचा-यांनी पाहणी केली असता त्याने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत हर्षल राव यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten