नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौळाणे रोड भागात सिमेंट मिक्सर मशिनवर काम करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कुणाल खेमा वळवी (१९ मुळ रा.मांडवी जि.नंदूरबार हल्ली विजयनगर सिडको) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वळवी बुधवारी (दि.१) पाथर्डी गौळाणे रोडवरील एका बांधकाम साईटवर काम करीत होता. मशिनच्या माध्यमातून तो सिमेंट कालवण्याचे काम करीत असतांना मशिनमध्ये इलेक्ट्रीक करंट उतरल्याने ही घटना घडली. या घटनेत शॉक लागल्याने तो दुरवर फेकला गेला. त्यामुळे ठेकेदार संजय कुमावत यांनी त्यास बेशुध्द अवस्थेत तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
१३ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अशोक नगर भागात हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेला सुमारे १३ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर जिवराम बडगुजर (रा.देवेंद्र अपा.अंबिका स्विट जवळ,अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बडगुजर हॉटेल व्यावसायीक असून त्यांचे परिसरातच समर्थ नावाचे हॉटेल आहे. गेल्या २१ जून रोज ते हॉटेलमध्ये साफसफाई करीत असतांना अज्ञात चोरट्या ग्राहकाने काऊंटरवर ठेवलेला त्यांचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten