नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी पात्रात उडी घेत ३० वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. ही घटना आनंदवली भागात घडली असून सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहूल कैलास सोनवणे (मुळ रा. भातखंडा जि.जळगाव हल्ली राजवाडा,आनंदवली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहूल सोनवणे याने बुधवारी (दि.१८) रात्री अज्ञात कारणातून आनंदवली परिसरातील गोदापात्रावरील छोट्या पुलावरून पाण्यात उडी घेतली होती.
ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी धाव घेत त्यास पाण्याबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten