व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रोहित पवारला आलेली `ती` नोटीस अखेर हायकोर्टाने केली रद्द…..हे दिले आदेश

India Darpan by India Darpan
October 19, 2023 | 4:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या, संमिश्र वार्ता
0


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीसच हायकोर्टाने रद्द केली आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाने नव्याने निरीक्षण करुन नोटीस जारी करावी, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. रोहित पवार यांना १५ दिवस मुदत देऊन त्यांचे उत्तर मागवून घ्या. मग नंतर निर्णय घ्या, असे कोर्टाने आदेश दिले.

मध्यरात्री नोटीस आल्यानंतर रोहित पवार यांनी दुस-या दिवशी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हा निकाल आला आहे. ही नोटीस आल्यानंतर रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो ! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. पण, या ट्वीटमध्ये राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचे म्हटले पण, त्यांचे नाव मात्र पुढे आले नाही. पण, आज ही नोटीस रद्द झाली.
The notice to Rohit Pawar was finally canceled by the highcourt…..ordered this.

……


Previous Post

गोदावरी नदी पात्रात उडी घेत ३० वर्षीय तरूणाची आत्महत्या

Next Post

फिजिक्‍सवालाने पीडब्‍ल्‍यू आयओआय स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट सुरु केले… बघा नेमकं काय आहे

Next Post

फिजिक्‍सवालाने पीडब्‍ल्‍यू आयओआय स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट सुरु केले… बघा नेमकं काय आहे

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.