नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर भागात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईडच्या तिस-या मजल्यावरून पडल्याने वृध्द कामगाराचा मृत्यू झाला. हरिश्चंद्र काशिनाथ खरात (७३ रा. श्रमिकनगर,गंजमाळ) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खरात रविवारी (दि.१५) दामोदरनगर भागातील शिवप्राईड इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली. तिसºया मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल जावून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
ठेकेदार मुस्ताक अली खान यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten