नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -४९ वर्षीय कर्मचा-याचा शालेय संस्थेच्या भुखंडावरील झाडाच्या फांद्या तोडत असतांना पडल्याने मृत्यू झाला. भास्कर रायाजी मोरे (४९ रा.विल्होळी ता.जि.नाशिक) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. ही घटना जॉगिंग ट्रॅक भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोरे विल्होळी येथील सुखदेव प्राथमिक आश्रम शाळेत शिपाई पदावर कार्यरत होते. सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागातील साती आश्रम मंदिराशेजारील भुखंडावर असलेल्या झाडांच्या फांद्या तोडत असतांना ही घटना घडली. संस्थेच्या वतीने फांद्या तोडण्याची परवानगी घेण्यात आल्याने शनिवारी (दि.१६) मोरे यांना पाचारण करण्यात आले होते. दुपारच्या सुमारास उंच झाडावर चढून ते फांद्या तोडत असतांना अचानक तोल जावून पडले होते.
या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने संस्थेचे व्यवस्थापक विजय काळे यांनी त्यांना तातडीने अशोका हॉस्पिटल येथे दाखल केले होते. दुस-या दिवशी अधिक उपचारार्थ त्यांना जिल्हा रूग्णाल्यतात हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खरोटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten