नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॅक खात्यातील साडे सात लाख रूपयांची रक्कम परस्पर काढून घेत अपहार केल्याची घटना समोर आली आहे. हॉस्पिटल व्यवसायात भागीदारीतील सर्व अधिकार स्व:ताकडे घेत एकाने डॉक्टरला गंडा घातला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुक,अपहार व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार सुरेश यादव (रा.विजय लक्ष्मी अपा.सावंत कॉलेज जवळ) असे डॉक्टरला गंडविणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.पंकज आनंदराव सोनोने (रा.बापू बंगल्याजवळ, इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार डॉक्टर हे एकमेकांचे भागीदार असून त्यांचे महामार्गावरील सुर्या हॉटेल पाठीमागील प्रसन्ना कॉलनीत श्रीयष नावाचे हॉस्पिटल आहे.
भागिदारीतील हॉस्पिटलचा व्यवसाय सांभाळण्याची संशयितावर जबाबदारी असतांना त्याने हे कृत्य केले. हॉस्पिटलचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेत संशयिताने बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून शरणपूररोडवरील कोटक महिंद्रा बॅकेत या व्यवसायाचे चालू खाते उघडले होते. २९ डिसेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२२ या काळात भागीदारांची परवनागी न घेता संशयिताने स्व:ताच्या फायद्यासाठी वेळोवेळी सुमारे ७ लाख ५५ हजार ४५८ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. रकमेचा अपहार झाल्याची बाब समोर येताच सोनोने यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten