नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या एका महिलेस तब्बल ३१ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अॅमेझोन या कंपनीचा घाऊक माल मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. ही ३१ लाखाची रक्कम युपीआय आणि आरटीजीएसच्या माध्यमातून घेतली. पण, संशयिताने माल व पैसे न दिल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर शिवाजी उगले (रा.शिवशक्तीनगर,सरस्वतीचौक त्रिमुर्ती चौक सिडको) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी माधुरी धनगर (रा.कामटवाड) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी संशयिताशी महिलेशी ओळख झाली होती. यावेळी महिलेने व्यावसायीक चर्चा केली असता संशयिताने अॅमेझोन या कंपनीच्या लागणा-या सेलबाबतची माहिती देवून माल मिळवून देण्याची ग्वाही दिली. अल्पदरातील कपड्यासह विविध प्रकारच्या वस्तूंची माहिती देण्यात आल्याने महिलेने संमती दर्शविली.
यावेळी संशयिताने हा माल घाऊक पध्दतीने खरेदी करावा लागत असल्याने मोठ्या रकमेची मागणी केली. त्यानुसार १३ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२३ दरम्यान सदरची रक्कम युपीआय आणि आरटीजीएसच्या माध्यमातून अदा करण्यात आली. अनेक दिवस उलटूनही माल अथवा पैसे परत न मिळाल्याने धनगर यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten