नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य करण्यात आले. अतिरेक वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार, पोक्सो व माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक नंदलाल कुशवाह (२३ रा.मेदगेनगर,पाटील पार्क अंबड लिंकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून संशयिताने ओळखीचा फायदा उचलत सन. २०१८ मध्ये प्रथम बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला.
त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने शहरातील रॉयल इन हॉटेल पाथर्डी फाटा,त्र्यंबकरोडवरील हॉटेल साई किनारा आणि पपया नर्सरी भागातील हॉटेल अन्नपूर्णा येथे घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने मुलीने आपबिती कुटुंबियाकडे कथन केल्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक कारंडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten