नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील काळीवाडा चौकात किरकोळ कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दगडफेक करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरोधीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन लहानू भोई, चेतन लहानू भोई,हर्षल निवृत्ती चहाळे,ऋषीकेश गोरख चहाळे,गोरख चिमाजी चहाळे,रोहन उर्फ कडक प्रकाश चौधरी,अनिकेत गोरख राठोड (रा. सर्व कोळीवाडा नानावली), रिजवान शमशुद्दीन शेख (रा. भारतनगर) व इम्तियाज शमशुद्दीन शेख (रा.वडाळागाव) व त्यांचे चार ते पाच साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार विशाल वाघ यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.३) रात्री कथडा येथील कोळीवाडा चौकात असलेल्या तुळजा भवानी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाजवळ संशयित आपआपसात हाणामारी करतांना मिळून आले.
दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत अनिकेत राठोड, इम्तियाज शेख, निजामुद्दीन शेख आदी तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एक जण गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दरम्यान जखमींपैकी एकाचा मुलगा रस्त्याने गात जात असल्याचे कारणातून हा राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी सचिन भोई,चेतन भोई,हर्षल चहाळे,ऋषीकेश चहाळे,कडक चौधरी व गोरख चहाळे आदींना अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten