नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना सिडकोतील राणेनगर भागात घडली. चेतन दगाजी शेवाळे (३२ रा. गणपती मंदिरामागे स्वामी विवेकानंद चौक,राणेनगर) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या कडीला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
दुस-या घटनेत मनोज संजय बोरसे (वय ४० रा.तुळजाई निवास,जिजामाता कॉलनी,शिवाजीनगर) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सरनाईक करीत आहेत.
सिटी लिंक बसमध्ये वृद्ध महिलेचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निमाणी बसस्थानक परिसरात सिटी लिंक बसमध्ये प्रवास करणा-या वृद्ध महिलेच्या बॅगेतील दागिने चोरटयांनी लंपास केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना देविदास वराडे (वय ६५ रा.सिन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वराडे सोमवारी (दि.२०) सिटी लिंक बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. निमाणी बस स्थानक परिसरात गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चाळीस हजार रूपये किमतीचे अलंकार भामट्यांनी चोरून नेले. अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten