नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी गावातील आनंदनगर पोलिस चौकी भागात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिस्पर्धी तक्रारदार एकमेकांमध्ये भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनाही न जुमानता गोंधळ घालणा-या सहा जणांविरूध्द इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी मुरलीधर डेमसे, विष्णु मुरलीधर डेमसे, सागर तानाजी डेमसे, रामदास मुरलीधर डेमसे आणि अशोक तानाजी डेमसे (सर्व रा. पाथर्डी गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. याबाबत सहाय्यक उपनिरीक्षक महम्मद रियाजोद्दीन कमरोद्दीन शेख यांनी फिर्याद दिली आहे.
पाथर्डी गावातील डेमसे कुटुंबियांना सोमवारी (दि.२०) एका प्रकरणातील चौकशीसाठी आनंदनगर येथील पोलिस चौकीवर बोलविण्यात आले होते. वेगवेगळी कुटूंबियातील सदस्य एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची होवून एकमेकांमध्ये भिडले. पोलिसांनाही न जुमानता या कुटुंबियातील सदस्यांनी चौकीच्या आवारातच गोंधळ घालत हाणामारी केली. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten