नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप सुधाकर दिघे (३८) असे संशयिताचे नाव असून तो पाथर्डी फाटा भागात राहतो.
याबाबत परिसरातील पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडित व संशयित एकमेकांचे परिचीत असून २०२१ पासून दोघांमध्ये प्रेमसंबध आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने युवतीवर वेळोवेळी बलात्कार केला.
तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारे प्रकार वाढले असून त्यामुळे याअगोदही गुन्हे दाखल झाले आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten