नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामनगाव रोडवर मॅफेड्रोन या घातक अमली पदार्थाची विक्री करतांना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून १२.५ ग्रॅम व ५० हजार रूपये किमतीचा मॅफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. गणेश संजय शर्मा (२०, रा. म्हाडा, सामनगावरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात एनपीडीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदाज वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या संशयिताने हायप्रोफाइल लोकांसह नशेबाजांना ड्रग्ज पुरविण्यासाठी एमडी घेतल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याने पोलिस त्यानुसार तपास करीत आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सुभाष राजाराम घेगडमल यांना संशयित शर्मा हा एमडी या अमली पदाथार्ची विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांसह पथकाच्या कर्मचा-यांनी सामनगाव रस्त्यावरील म्हाडा परिसर गाठला असता प्रवेशद्वाराजवळच संशयित शर्मा पोलिसांच्या हाती लागला. संशयिताच्या अंगझडतीत पन्नास हजार रुपयांचे १२.५ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. शर्माच्या खिशातील रोकड व दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून त्याने मॅफेड्रोन (एमडी) हा पदार्थ कोणाकडून आणला, कोणत्या व्यक्तिला विक्री करणार होता, यासंदर्भात अद्याप पोलिसांना माहिती दिलेली नाही. परंतु, प्राथमिक चौकशीमध्ये त्याने मुंबईतून कोणाच्या तरी संपकार्तून एमडीची खरेदी केल्याचे समोर येत आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक फड करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
….