नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पिकअप वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना गजाआड केले आहे. हर्षल वसंत भंडारी (२९ रा.सोन्या मारूती कॉलनी,रेल्वे स्टेशनच्या मागे धुळे) व शुभम अशोक पवार (२३ रा.देवी मंदिराजवळ,संजयनगर सेवाकुंज मार्ग पंचवटी) अशी एक्साईज विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई एक्साईज विभागाच्या ब विभाग पथकाने केली. याप्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावरून कर चुकवून देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती ब विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक सुनिल देशमुख यांच्या पथकाने विल्होळी भागातील हॉटेल विजयानंद येथे सापळा लावला असता संशयितांसह मुद्देमाल एक्साईज विभागाच्या हाती लागला.
मुंबईकडून भरधाव येणा-या एमएच १५ जेव्ही ०८९८ हे पिकअप वाहन थांबवून पथकाने पाहणी केले असता मालवाहू पिकअपमध्ये प्रिन्स संत्रा नावाची देशी दारूचा साठा मिळून आला. राज्याचा महसूल बुडवून या दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याचे समोर येताच वाहनाच्या चालकासह त्याच्या साथीदारास ताब्यात घेण्यात आले असून या कारवाई पिकअपसह दारू साठा असा सुमारे ४ लाख ६० हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक पी.बी.ठाकुर,धिरज जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप,मनोहर गरूड जवान संतोष कडलग,अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर,सुनिल दिघोळे,साक्षी महाजन व वाहनचालक राकेश पगारे आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten