नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारंवार होणा-या वाहन चोरीच्या घडत असतांना पोलिसांच्या हाती जळगाव येथील सराईत दोन दुचाकी चोर हाती लागले आहे. या चोरांकडून तब्बत पावणे सात लाख रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या दुकलीच्या अटकेने नाशिक शहर व ग्रामिण सह जळगाव, औरंगाबाद आणि मध्यप्रदेशातील चोरीचा उलगडा झाला आहे.
अजय शंकर चव्हाण (२९) व उत्तम प्रेमा पवार (३२ रा. दोघे सुप्रिम कॉलनी नवनाथनगर,एमआयडीसी जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जेलरोड परिसरातील पेंढारकर कॉलनीतून गेल्या ७ जून रोजी रात्री एमएच १५ सीवाय १५२९ ही अॅक्टीव्हा चोरीस गेली होती. परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवित ही कारवाई केली असून उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
या ठिकाणाहून चोरल्या दुचाकी
पोलिस तपासात संशयितांनी उपनगर हद्दीसह पिंपळगाव (ब.), चोपडा शहर, जळगाव शहर, जामनेर, औरंगाबाद ग्रामिण व मध्यप्रदेशातील ब-हाणपूर पोलिस ठाणे हद्दीतूनही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणी जावून संशयितांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ७० हजार रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यात चार अॅक्टीव्हा,चार होंडा शाईन,स्प्लेंडर व अन्य एक आदी दुचाकींचा त्यात समावेश आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ. उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे व बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक गोसावी,हवालदार विनोद लखन,पोलिस नाईक सोमनाथ गुंड शिपाई पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे,जयंत शिंदे,राहूल जगताप,सुरज गवळी, सौरभ लोंढे,राहूल जाधव, संदेश रघपतवान आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten