नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार घटना घडल्यानंतर आता मृतांची नावेही समोर आली आहे. त्यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव , अनिल विष्णू पाटील, कृष्णाकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश आहे. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील चार ठार जण जागीच ठार झाल्याचे समोर आले होते. पण, त्यांची नावे मात्र समजली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्यांची नावे समोर आली आहे. किरण अहिरराव हे नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे भाऊ असल्याचे समजते.
सकाळी सात वाजता हा अपघात झाला होता. कारमधील हे सगळे नाशिककडून धुळे येथे चालले होते. अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची नावेही समोर आली. या घटनेनंतर पोलिस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. येथे मदतकार्य करण्यात आले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. या अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे.
रविवारी चिखलदराच्या घटनेत तिघांचा मृत्यू
रविवारी अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले होते. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ ही कार खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले. हे सर्व मृतक आणि जखमी आंध्रप्रदेशातील होते.
या अपघात झाल्यानंतर कारचा चेंदामेंदा झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक चिखलदऱ्यात आले होते. अमरावती-चिखलदरा मार्गावरून जात असताना ही घटना घडली. काल चिखलदरात ही घटना घडली आज चांदवड जवळ कारचा अपघात झाला..
Fatal car-container accident near Chandwad: Four killed on the spot