India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे श्रावण महिन्यात पाच कोटीहून अधिक रक्कम जमा झाली सशुल्क दर्शनातून

India Darpan by India Darpan
September 18, 2023
in स्थानिक बातम्या
0
संग्रहीत फोटो

संग्रहीत फोटो



त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर देवस्थानला श्रावण महिन्यात जवळपास पाच कोटीहून अधिक रक्कम सशुल्क दर्शनातून जमा झाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. या दोन महिन्यात सुमारे १२ लाखांहून अधिक भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. २३ जुलै रोजीच्या एकाच दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थानला १४ लाखांचे उत्पन्न सशुल्क दर्शनातून मिळाले.

त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दर्शन रांगेसह सशुल्क दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यातून १८ जुलै ते १४ सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच कोटी तीन लाख ७९ हजार ८०० रुपयांची कमाई देवस्थानकडे जमा झाली आहे. १८ जुलै रोजी अधिक मासाला प्रारंभ झाल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी संपला. या एक महिन्याच्या कालावधीत सशुल्क दर्शनातून २ कोटी ६१ लाख २१ हजार ८०० रुपये जमा झाले.

१७ ऑगस्ट रोजी श्रावण सुरुवात होऊन १४ सप्टेंबर रोजी श्रावण संपला, या एक महिन्याच्या कालावधीत २ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपये सशुल्क दर्शनातून जमा झाले. अशा पद्धतीने दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५ कोटी ३ लाख ८० हजारांची कमाई त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला झाली. या दोन महिन्यांच्या कालावधीत पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले होत असत, पहाटेपासूनच भाविकांची तुडुंब गर्दी दर्शनासाठी असायची. यात अनेक भाविक दोनशे रुपयांच्या सशुल्क दर्शनाचा माध्यमातून ही रक्कम जमा झाली आहे.
In the month of Shravan, Trimbakeshwar temple collected more than five crores from paid darshan


Previous Post

चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात ठार झालेल्यां चार जणांमध्ये धुळे येथील नगरसेवक

Next Post

शिवशक्ती यात्रेत पंकजा मुंडे यांची सोनसाखळी चोरणारे दोन चोर गजाआड

Next Post

शिवशक्ती यात्रेत पंकजा मुंडे यांची सोनसाखळी चोरणारे दोन चोर गजाआड

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group