इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मॅच फिक्सिंगमुळे किती वाताहत होऊ शकते, हे साऱ्या जगाने बघितले आहे. जगातील सर्वांत मोठे मॅच फिक्सिंग कितीतरी क्रिकेटपटूंचे करीयर उध्वस्त करणारे ठरले, हेही साऱ्यांना ठावूक आहे. मात्र तरीही वारंवार मॅच फिक्सिंग होत असते आणि आता एका मोठ्या फिक्सिंगमध्ये अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.
यूएईत २०२१ मध्ये टी -१० लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फिक्सिंग झाल्याचा आरोप अनेकांवर होता. त्यानुसार चौकशी करण्यात आली आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने डिफॉल्टर अधिकाऱ्यांची यादीच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात तीन भारतीय लोकांचाही समावेश आहे. या स्पर्धेसाठी भ्रष्टाचार विरोधी पथक नेमले होते. या भ्रष्टाचार विरोधी पथकाने प्रकरण उघडकीस आणले आहे. ज्यात २ भारतीय संघ मालकांचा समावेश आहे. तसेच बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनला ७५० डॉलर्स भेट म्हणून मिळाले होते. ही माहिती त्यांनी लपवून ठेवली असा आरोप DACO ने केला आहे. आरोप करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत फलंदाजी प्रशिक्षक अझहर जैदी, व्यवस्थापक शादाब अहमद आणि यूएईचे खेळाडू रिजवान जावेद आणि सलिया समन यांचा समावेश आहे. आयसीसीने ६ खेळाडूंना निलंबित केलं असून आरोपींना उत्तर देण्यासाठी १९ दिवसांचा अवधी दिला आहे.
या भारतीयांचा समावेश
पराग संगवी आणि कृष्णा कुमार हे दोघेही पुणे डेव्हिल्स संघाचे मालक आहेत आणि त्यांच्यावर फिक्सिंगचा आरोप आहे. तसेच फलंदाजी प्रशिक्षक सन्नी ढील्लोचा देखील यात समावेश आहे. पराग संगवी यांच्यावर सट्टा लावण्याचा व तपास पथकाला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
असाही आरोप
सन्नी ढील्लोचा यांच्यावर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह कृष्णा कुमार यांनी या सर्व गोष्टी भ्रष्टाचार विरोधीत तपास पथकापासून लपवून ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Match fixing again in cricket… Action against these Indian players