लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कांदा उत्पादक महिलेच्या खात्यात चुकून जमा झालेले १ लाख ७६ हजार रुपये त्यांनी ज्यांच्या खात्यातून पैसे आले त्या महिलेला पुन्हा परत करण्यात आले आहे. लासलगाव येथील कमल सोनवणे यांच्या प्रॉव्हिडंटचे पैसे जमा करतांना बँके कडून चकून खात्याचा शेवटचा नंबर चूकल्याने ते पैसे कांदा उत्पादक शेतकरी निर्मला कदम यांच्या खात्यात जमा झाले.
कांद्याचे अनुदान जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी कदम बँकेत गेल्या असता त्यांच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ती कुठून जमा झाली याचा शोध घेतल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर ज्यांची रक्कम होती त्या कमल सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्या रक्कमेचा चेक निर्मला कदम या शेतकरी महिलेने त्यांना पुन्हा परत केला.
एकीकडे कांद्याला भाव नाही अशा परिस्थितीत कांदा उत्पादक हवालदिल झालेला असतांना कांदा उत्पादक महिलेच्या खात्यात पडलेली रक्कम प्रमाणिकपणे संबंधित महिलेला दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
A farmer woman returned amount