येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या २ दिवसांपासून संप पुकारल्याने जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती बंद आहे. आज येवला येथे जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. जवळपास तीन तास या बैठकीत कांदा व्यापारी असोशियशनच्या पदाधिकार्यांनी आपली भूमिका मांडल्या.
यानंतर २६ तारखेला पणनचे अधिकारी व मंत्र्यांबरोबर मागण्यांसाठी होणाऱ्या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर राज्यातील सर्व व्यापारी बंद मध्ये सामील होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेतकरी सघटनांनी जे आरोप केले त्यामुळे सोमवार पासून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा देशावर पाठवला जाणार नाही. ४० टक्के निर्यात मूल्य रद्द करावे ही शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने हा निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी केली.
या बैठकीबाबत जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली ही माहिती