जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले असे बोलले जाते. पण, भाजपचे जुने जेष्ठ नेते व आता राष्ट्रवादीचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी फडणवीस हे माझ्यामुळेच मुख्यमंत्री झाले असे सांगितल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या.
खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना हा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. ते प्रदेशाध्यक्ष व्हावे यासाठीही मी मोठी मदत केली होती. एवढं करूनही उलट त्यांनी माझा छळ केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी
मी लहान सहान माणूस आहे. माझ्यामागे यंत्रणा लावल्या जातील, मला अडकवले जाईल, माझ्याबाबत असे काही राजकारण होईल याची मला अपेक्षा नव्हती. फडणवीस यांच्यासाठी मी खूप काही केलं. मात्र त्याच्या उलट मला जे काही मिळालं, त्याची मला अपेक्षा नव्हती, अशी खंतची त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडे, ना.स फरांदे, मी आणि आमच्यासह विविध नेत्यांनी केले. त्यामुळेच या पक्षाला ओबीसींचा पाठिंबा मिळाला. आणि पक्षाचा विस्तार होऊन पक्ष वाढला. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या प्रमाणे ओबीसींचे नेतृत्व भाजपकडून बाजूला केल जातंय. त्यांनी पक्षाला वाढवला त्यांनाच बाजूला करण्यात आलं. त्यामुळे भाजप हा ओबीसीवर अन्याय करतो की काय असं वाटत असल्याचेही ते म्हणाले.
खरं तर खडसे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले का यावर फडणवीस उत्तर देतील. पण, खडसे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादरी नाकारल्यामुळे फडणवीस पुढे आले. त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले हे वास्तव आहे.
Eknath Khadse’s secret explosion