India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलाचे जहाज या देशांच्या भेटीवर, हा आहे उद्देश

India Darpan by India Darpan
September 17, 2023
in राष्ट्रीय
0


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘समुद्र प्रहरी’ एक विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज असून ते सध्या ११ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आसियान देशांना भेट देणार आहे. ही भेट सागरी प्रदूषण प्रतिसादासाठी भारताच्या आसियान उपक्रमाचा एक भाग असून भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण प्रतिसाद क्षमतांचे प्रदर्शन करते तसेच सागरी प्रदूषण समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आसियान प्रदेशातील क्षमता वाढवण्याची त्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

हे जहाज चेतक हेलिकॉप्टरने सुसज्ज असल्यामुळे त्याची या प्रदेशातील प्रदूषण रोखण्याची क्षमता वर्धित झाली आहे. या उपक्रमाची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंबोडियामध्ये झालेल्या आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत केली होती.
या प्रवासादरम्यान हे जहाज बँकॉक, हो ची मिन्ह आणि जकार्ता या बंदरांना भेट देणार आहे. ही भेट भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण नियंत्रण क्षमता आणि सागरी प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने सहयोगी प्रयत्नांसाठीचे समर्पण दर्शवते.

विदेशी आदानप्रदान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, “पुनीत सागर अभियान” मध्ये सहभागी होण्यासाठी या जहाजावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) १३ कॅडेट्सना आमंत्रित करण्यात आले आहे. हे कॅडेट्स या आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत भागीदार राष्ट्रांच्या समन्वयाने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील.

या भेटीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण, क्रॉस-डेक भेटी, नियोजन आणि टेबलटॉप उपक्रम, संयुक्त कवायती, तसेच क्षमता-निर्माण सुविधांच्या भेटीसह अधिकृत आणि सामाजिक भेटींचा समावेश आहे. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज (ICGS) समुद्र प्रहरीची आसियान देशांची भेट, सागरी सहकार्याद्वारे मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याच्या भारताच्या निरंतर प्रयत्नांना बळ देते.
Indian Coast Guard ship on visit to these countries, this is the purpose


Previous Post

मोदी, शाह मुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही, तर कोणामुळे ? एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

Next Post

सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाने टेकले गुडघे; एकाच षटकात सिराजने घेतल्या चार विकेट

Next Post

सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाने टेकले गुडघे; एकाच षटकात सिराजने घेतल्या चार विकेट

ताज्या बातम्या

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॅाम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी

September 29, 2023

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट… तब्बल १३ जणांचा मृत्यू…

September 29, 2023

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group