इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – संपूर्ण जग एका बाजुला आणि चीन दुसऱ्या बाजुला अशी स्थिती आहे. हा देश कधी काय विचार करेल, कोणत्या प्रसंगात काय संधी शोधेल, याचा कधीच अंदाज लावता येणार नाही. आशियाई देशांचे लक्ष एशियन गेम्सकडे असताना अचानक हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आणि सर्वांनाच धक्का बसला. पण चीनला हे युद्ध हवेच होते. त्यामागचे कारण आपण समजून घेऊया.
शंभर वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीचा प्रयोग करणाऱ्या इस्रायलने मुस्लीम देशांच्या वेढ्यात राहून सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व कायम ठेवले. प्रगत राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. चीनला मध्यपूर्वेतील राष्ट्रांमध्ये आपली पकड निर्माण करण्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होती. कारण इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि आता काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियानेही इस्रायलसोबत एक करार केला होता.
दुर्दैवाने सौदी अरेबिया आता या करारापासून मागे हटणार आणि चीनला सौदीसोबत आपली मैत्री घट्ट करण्याची आणखी एक संधी मिळणार. दरम्यान, चारही बाजुंनी मुस्लीम राष्ट्रांनी वेढलेल्या इस्रायलने प्रगत राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करणे आसपासच्या मुस्लीम राष्ट्रांना नकोच होते. त्यामुळे त्यांनी उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. इराण, कतार, तुर्की आणि पाकिस्तानने हमासला पाठिंबा दिल्यामुळे चीनच्या मनात लाडू फुटायला लागले आहेत.
अमेरिकेचा बिनशर्त पाठिंबा
चीनने इस्रायल आणि पॅलेस्टाईनला शांतता राखण्याचे आवाहन केले असले तरीही अमेरिकेने मात्र इस्रायलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही सीमांवरील युद्धसदृष्य परिस्थिती शांत झाली नाही तर अमेरिका आपले सैन्य उतरविण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, इराणने हमासला सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. तसे झाल्यास या युद्धात अमेरिका आणि इराण दोन्ही आमने सामने येऊ शकतात. आणि त्या परिस्थितीत जगावर मोठे संकट आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
Who benefits from Israel’s war? Who loses? What about China and America?