इंडिया दर्पण डेस्क
भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने कारवाई करत तेलगू देशम पार्टीचे नेते व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटे अटक केली आहे. त्यांच्याविरोधात २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आज ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेनंतर आंध्रप्रदेशात खळबळ उडाली असून राजकारणही तापले आहे. कौशल विकास घोटाळ्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे.
चंद्राबाबू हे नंदयाला दौऱ्यावर असतांना ते एका बसमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. चंद्राबाबू नायडू गाढ झोपेत असतानाच सीआयडीची टीमने पहाटे ३ वाजता आरके फंक्शन येथील कँम्पमधून ही अटक केली. त्यांना नांदयाल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडीच्या टीमने अटक केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काय आहे आरोप
नायडू हे सत्तेत असतांना त्यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट ही योजना राबवली. या योजनेतंर्गत तरुणांना नोकरीसाठी तयार करण्याची योजना होती. ही जबाबदारी Siemens या कंपनीला दिला होती. सहा क्लस्टर्स तयार करण्यात आले होते, याचा एकूण खर्च ३३०० कोटी होता. राज्य सरकारमधील एकूण १० टक्के म्हणजेच, ३७९ कोटी रुपये खर्च करणार होते. इतर ९० टक्के खर्च कौशल विकास प्रशिक्षण देणारी कंपनी Siemens करणार होती. चंद्रबाबू नायडू सरकारने त्यांच्या वाट्याचे ३७१ कोटी रुपये शेल कंपनीला ट्रान्सफर केले. असा त्यांच्यावर आरोप आहे. ही अटक झाल्यानंतर नायडून यांनी न्यायालयात प्रकरण सुरु असताना अटक कशी कऱण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रह्मानंद रेड्डी, भूमा अखिलप्रिया, जगत विख्यात रेड्डी, एवी सुब्बार रेड्डी, बीसी जनार्दन रेड्डी आणि स्थानिक नेत्यांना पोलिसांनी बेड्या ताब्यात घेतले आहेत.
Telugu Desam Party leaders including former Chief Minister Chandrababu Naidu arrested; This is the reason