दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराचा स्लॅब कोसळून आजोबा व नातू ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजीला सुखरूप बाहेर काढले. नळवाडपाडा शिवारातील वस्तीवर एका बंद कंपनीच्या जुन्या खोलीत झोपलेले गुलाब वामन खरे (आजोबा) विठा बाई गुलाब खरे, निशांत विशाल खरे (नातू )रा. नळवाडी हे सदर खोलीचे छत स्लब व भिंत कोसळून दाबले गेले. यात आजोबा गुलाब खरे व निशांत खरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजीला सुखरूप बाहेर काढले.
गुरुवारी पहाटे पासून तालुक्यात पाऊस सुरू असून दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या असून त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी व नातू समवेत राहत होते गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळत त्याखाली ते दाबले गेले. शेजारी त्यांचे मुलाला आवाज येताच त्यांनी तेथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छता खाली दाबल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित व ग्रामस्थांना कळवले सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली. .जेसीबी बोलवण्यात आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चार च्या सुमारास सरपंच हिरामण गावित,शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा व नातू मयत झाले होते. तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
A grandfather and grandson were killed when a slab of their house collapsed at Nalvadpada in Dindori taluka