नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपये लाच प्रकरणात सहा.दुय्यम निबंधक कार्यालयातील वरीष्ठ लिपीक, एजंट व डाटा एंन्ट्री ऑपरेटर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांनी जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी व्यक्ती (एजंट ) दत्तू देवरे यांनी पंचासमक्ष ५०० रुपये लाचेची मागणी केली. तसेच सह दुय्यम निबंधक कार्यालयातील वरीष्ठ लिपीक ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर यांचे सांगण्यावरून डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन वरील नमुद आरोपी यांचे विरूद्ध छावणी पोलीस ठाणे मालेगाव येथे कलम ७(अ ),१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी केली कारवाई
*युनिट – नासिक
*तक्रारदार- पुरुष वय- ५६ वर्ष, मालेगाव
आरोपी
१) आलोसे ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर,वय ३२ वर्ष, वरिष्ठ लिपिक सह दुय्यम निबंधक वर्ग-२ मालेगाव-१ अतिरिक्त कार्यभार सह दुय्यम निबंधक,वर्ग-२ मालेगाव
२) खाजगी व्यक्ती विठोबा सूरीतराम शेलार,वय ३६ वर्ष, व्यवसाय डाटा एन्ट्री ऑपरेटर सह दुय्यम निबंधक कार्यालय मालेगाव क्रमांक १
३) एजंट दत्तू देवरे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही
लाचेची मागणी- ५०० रुपये
*तडजोडी अंती लाचेची रक्कम स्वीकारली– ५०० रुपये
*लाचेची मागणी व स्विकारली दिनांक– ता. ०९/११/२०२३
लाच मागण्याचे कारण –
तक्रारदार यांनी जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी व्यक्ती (एजंट ) दत्तू देवरे यांनी पंचासमक्ष ५००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर यांचे सांगण्यावरून व त्यांनी दिलेल्या अपप्रेणेमुळे आरोपी क्र २ शेलार यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन वरील नमुद आरोपी यांचे विरूद्ध छावणी पोलीस ठाणे मालेगाव येथे कलम ७(अ ),१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी:-
नाना सूर्यवंशी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक
सापळा पथक* – ,
१) पो.हवा/सचिन गोसावी,
२) पोना/गणेश निंबाळकर,
३) पोना/प्रमोद चव्हाणके,
४) चालक पोना/परशुराम पवार
सर्व नेमणूक लाप्रवि नासिक.