नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर व्हीटीसी फाट्याजवळ तीन वाहनांचा अपघात झाला. यात आठ जण जखमी झाले. ट्रकने प्रवासी ओमनीला पाठीमागून धडक दिल्याने ती पलटी झाली तर त्यानंतर क्रेटा कार जाऊन त्यावर आदळली.
या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवारी दुपारी ३ वाजता नाशिककडून मुंबईकडे जात असताना व्हीटीसी फाट्याजवळ एका ट्रकने वाहनाने पाठीमागून प्रवासी ओमिनीला जोरदार धडक मारल्याणे ओमिनी पलटी झाली. तर क्रेटा कार दुभाजकावर जावून धडकली. या अपघात झाला अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व जखमीला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ट्रक घेऊन चालक पसार झाला. या अपघातात क्रेटा क्रं MH.03.DA.6872, ओमिनी क्रं.MH.15.E.1638 या वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात विठ्ठल वाळुजी गायधनी (७३), अमित पप्पु पुरेसी (३०),साहिल सराफत पुरेसी (३०) रा. नाशिक, सरोज कुमार श्रीपत अतरदे (६०) उर्मिला सरोज अतरदे (५०) रा. डोंबिवली ही जखमी झाली आहे. तर तीन जखमींचे नाव मिळू शकले नाही.