इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारचे वाभाडे काढत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसात ड्रग्ज प्रकरणात त्यांनी पुणे पोलिसांसह सत्ताधारीवर अनेक आरोप केले आहे. आता त्यांनी नवीन ट्विट करत परत गृहखात्यावर टीका केली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..
कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm
आता हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यावर आता पुणे पोलिस काय स्पष्टीकरण देतात व काय कारवाई करतात हे महत्त्वाचे आहे.