नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेन्शन प्रश्नावर बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर नगरपरिषद व नगरपालिका कर्मचारी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे.
हे सर्व जण गोल्फ क्लब मैदानावर एकत्र येथील. त्यानंतर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाची सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद शालीमार, सायखेडकर नाट्यगृह, रेड क्रॉस सिग्नल व मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा जाणार आहे. येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.
या मोर्चाला सर्व कर्मचा-यांनी कुटुंबियासह उपस्थितीत रहावे असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक दिनेश वाघ, सीटु राज्याध्यक्ष डॅा. डी एल कराड, आयटक उपाध्यक्ष राजू देसले, टीडीएफ संघटनेचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मोहन चकोर, पेन्शन संघटना उत्तमबाबा गांगुर्डे, शिक्षक संघटना रमेश गवळी, संजय शेवाळे, जिल्हा परिषद महासंघ अध्यक्ष अरुण आहेर, यांच्या सह शामसुंदर जोशी, जितेंद्र पालवे, काळू पाटील बोरसे, राजू अहिरे, ज्ञानेश्वर कासार, रवी पवार,कैलास वाघचौरे, विजय हळदे,मधूकर आढव, मनोज आहिरे, तुषार नागरे,जीवन आहेर, निलेश गवळी यांनी केले आहे.